मनालीतला चरस माफिया एटीएसच्या जाळ्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या विक्रोळी युनिटने हिमाचल प्रदेशच्या कुलू-मनालीमध्ये धडक कारवाई केली. मुंबई, पुण्यासह बंगळुरू आणि गोव्याला मनाली चरसचा सप्लाय करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला एटीएसने बेडय़ा ठोकल्या आहेत. आरोपी रुमी ठाकूर हा तेथील हॉटेल व्यावसायिक असून हॉटेल व्यवसायाच्या पडद्याआड ड्रग्जचा धंदा करीत होता.

गेल्या काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी दोघा ड्रग्ज तस्करांना 32 किलो चरससह अटक केली होती. त्यानंतर हा गुन्हा पुढील तपासाकरिता एटीएसकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रोळी युनिटचे पोलीस निरीक्षक गिरीश बने व पथकाने तपास सुरू केला. पुणे पोलिसांनी पकडलेल्या तस्करांची लिंक कुलू- मनालीपर्यंत जाऊन थांबल्याने बने व पथक मनालीला गेले. परंतु तेथे स्थानिक पोलिसांकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य न मिळाल्याने एटीएसचे पथक काही दिवस थांबून पुन्हा माघारी परतले. थोडय़ा दिवसांनी परत बने व त्यांचे सहकारी मनालीत गेले. पण यावेळी त्यांनी आपल्याबाबत कोणाला काही समजू दिले नाही. एक महिना तेथे राहून त्यांनी मुंबई, पुणे, बंगळूरू व गोवा येथे चरस सप्लाय करणारा रुमी ठाकूर हा प्रमुख ड्रग्ज तस्कर असून त्याचे मनालीत रिव्हर व्युव नावाचे हॉटेल असल्याची माहिती पथकाने काढली. त्यानंतर स्थानिक पोलीस तसेच तेथील ड्रग्ज तस्करी करणाऱ्या नेटवर्कला अजिबात कळू न देता रुमी ठाकूरला दोन दिवसांपूर्वी उचलले. त्यानंतर त्याला पुण्यात आणून कोर्टात हजर केले असता रुमीला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

म्होरक्या सापडलादोघांचा शोध सुरू

हिमाचल प्रदेशातून मनाली चरसचा सप्लाय करणाऱ्या टोळीचा रुमी ठाकूर हा म्होरक्या असून त्याचे अन्य दोन साथीदार देखील आहेतरुमी हाती लागला असला तरी अन्य दोघे सापडलेले नाहीतत्यामुळे एटीएसचे पथक आता त्या दोघांचा कसून शोध घेत आहेत.

पर्यटकांना चरस पुरवायचा

हॉटेलचा व्यवसाय करणारा रुमी ठाकूर हिमाचलमध्ये येणाऱ्या पर्यटकांना मनाली चरस पुरवायचा. शिवाय गोवा, मुंबई, पुणे आणि बंगळूरूतील हायप्रोफाईल नशेबाजांना देखील तो चरस उपलब्ध करून द्यायचा, असे एटीएसच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

आपली प्रतिक्रिया द्या