48व्या वर्षी दुसऱ्यांदा आई बनली मंदिरा बेदी

अभिनेत्री मंदिरा बेदी ही तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे ओळखली जाते. वयाच्या पन्नाशीच्या जवळ आलेल्या मंदिराने राखलेला फिटनेस अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. यात भर टाकणारी एक प्रेरणादायी गोष्ट तिने केली आहे.

मंदिरा वयाच्या 48व्या वर्षी दुसऱ्यांदा आई बनली आहे. तिने आणि तिचे पती राज कौशल यांनी एका चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतलं आहे. मंदिराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.

तिने एक फोटो शेअर केला असून त्यात तिचे पती राज कौशल, मुलगा वीर यांच्यासह त्यांच्या घरातील नवीन सदस्य असलेली मुलगी दिसत आहे. तिचं नाव तारा बेदी कौशल असं ठेवण्यात आलं आहे. 28 जुलै 2020 पासून तारा ही आपल्या कुटुंबाचा भाग झाल्याची माहिती तिने दिली आहे.

काय म्हणाली मंदिरा

मंदिराने आपल्या मुलीची ओळख करून देताना पोस्ट म्हणाली की, तारा आम्हा सर्वांसाठी एक दुवा बनून आली आहे. आमची छोटी मुलगी तारा. आमचा मुलगा वीर याने तिचं मोकळ्या मनाने स्वागत केलं. मला खूप आनंद होतोय की ती 28 जुलै 2020 पासून आमच्या आयुष्याचा एक भाग झाली आहे.

दसऱ्यानिमित्त आम्ही आमच्या घरची नवीन सदस्य तारा बेदी कौशल हिची ओळख करून देऊ इच्छितो. आता आमचं कुटुंब पूर्ण झालं, हम दो हमारे दो!

आपली प्रतिक्रिया द्या