
वारस नोंदीच्या हरकतीवर सुनावणी होऊन तक्रारदारांच्या बाजूने निकाल देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितल्याने मंडल अधिकाऱ्यासह कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
मदनसिंग सुपडसिंग परदेशी (मंडल अधिकारी, अपर तहसील कार्यालय मंद्रुप ता. दक्षीण सोलापूर), मल्लिनाथ रेकणसिध्द बाळगी (कोतकाल, अपर तहसील कार्यालय, मंद्रुप ता. दक्षीण सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदारांनी मंडल अधिकारी कार्यालयात दिलेल्या वारस नोंदीच्या हरकती अर्जावर सुनाकणी होऊन तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी कोतकाल बाळगी याने मंडल अधिकारी परदेशी यांच्यासाठी तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांची मागणी केली. त्याबाबत खात्री करून देण्यासाठी तक्रारदाराचे मंडल अधिकारी परदेशी यांच्याशी फोनकरून बोलणे करून दिले. मंडल अधिकारी परदेशी यांनी त्याला संमती दिल्याच पडताळणीत स्पष्ट झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही अटक केली आहे. याप्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार शिरीषकुमार सोनकणे, पोलीस नाईक अतुल घाडगे, पोलीस शिपाई स्कप्नील सण्णके, उडानशिक या पथकाने ही कारवाई केली आहे.





























































