आंबा कॅनिंगसाठी रत्नागिरीतील एक्सॉटिक कंपनी सुरु करण्याचा प्रयत्न- उदय सामंत

आंबा उत्पादकांमध्ये दोन प्रकार आहेत एक पेटीतून आंबा पाठवणारे आणि दुसरे कॅनिंगसाठी आंबा पाठवणारे आहेत. रत्नागिरीतील एक्सॉटिक ही कंपनी सुरु करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे. जे आंबा व्यवसायिक होम डिलिव्हरी करणार आहेत ते सोसायटीत जाऊन आंबा विक्री करू शकतात. तसेच मासेमारी नंतर मच्छी लिलाव करताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्वाचे आहे असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज आंबा बागायतदारांची बैठक पार पडली. त्याबैठकीनंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली ते म्हणाले की, जे आंबा बागायतदार गुजरात, राजस्थानला कॅनिंगसाठी आंबा पाठविणार आहेत ते आंबा पाठवू शकतात.रत्नागिरी जिल्हा अॉरेंज झोन मध्ये असून त्यासंदर्भात माहिती व मार्गदर्शक सूचना लवकरच प्राप्त होतील असे सामंत यांनी सांगितले.जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अनेक तक्रारी येत आहेत त्याबाबत महाराष्ट्र शासन निर्णय घेईल असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची माहिती देताना प्रलंबित तपासणी अहवाल आज प्राप्त होतील असे सांगताना संगमेश्वर येथे रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात मास्कची सक्ती करण्यात आली नसल्याचे सांगितले.मुंबईतून अनेक जण चोरी छुप्या मार्गाने रत्नागिरीत येत आहेत असे आढल्यास पोलिसांना माहिती द्या असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सांगितले यावेळी आमदार राजन साळवी उपस्थित होते.

रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरीबुवा यांच्यावतीने कोरोनाच्या लढ्यासाठी एक लाख रूपयांची मदत करण्यात आली आहे. पीरबाबरशेख देवस्थाननेही यापूर्वी एक लाख रूपयांची मदत केली आहे. त्याचबरोबर रत्नागिरीतील डॉक्टर दिलीप पाखरे यांनी पंतप्रधान निधीला आणि मुख्यमंत्री निधीला प्रत्येकी दहा हजार रूपयांची मदत दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या