
गणेशोत्सवानंतर परतलेल्या पावसामुळे आंब्याला आलेली पालवी कुजून त्याचा डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये येणाऱया आंब्याच्या मोहोरावर प्रतिपूल परिणाम होण्याची भीती आंबा बागायतदारांकडून वर्तवली जात आहे. परतीच्या आणि अवेळी पावसाचे आणखीन काही दिवस सातत्य राहिल्यास या वर्षीचा आंबा हंगाम नेहमीपेक्षा 15 दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता असून आंबा हंगामाला व बागायतदारांच्या उत्पन्नाला फटका बसण्याची चिन्हे आहेत.
या वर्षी गणेशोत्सवाच्या काळापासून पावसाने चांगलाच धुमापूळ घातला होता. त्याचा भातशेतीला फटका बसला तरी आंब्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरला होता. त्यातून आंब्यांच्या झाडांना चांगलीच पालवी फुटली होती. ज्याचा फायदा भविष्यामध्ये आंब्याला मोहोर येण्याला होणार होता. मात्र, गणेशोत्सवानंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या वरुणराजा गेल्या काही दिवसांपासून परतला असून त्याचा फटका आंब्याला बसत आहे.
‘काही आंबा कलमांना पालवी आली आहे. काही झाडांना पालवी येत आहे. अशा स्थितीमध्ये पाऊस आल्याने ही पालवी पुजण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आंब्याच्या येऊ घातलेल्या मोहोरावर होणार आहे. त्यातून या वर्षी आंब्याला मोहोर नेहमीपेक्षा 15 दिवस उशिरा येण्याची शक्यता आहे. ’
विजय शिंदे, आंबा बागायतदार





























































