
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानपरिषदेत रमी खेळतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी चौकशी लागली असून कोकाटे यांची भेट घेणार अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राम शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या अखत्यारित हा विषय येतो. त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी माझी आणि माणिकराव कोकाटे यांची भेट झालेली नाही. सोमवारी आमची भेट होईल आणि प्रत्यक्ष त्यांना मी याबाबत विचारेन असे अजित पवार म्हणाले.
मागेही कोकाटे यांनी विधानं केली होती, तेव्हाही मी त्यांना अशा प्रकारची वागणूक चुकीची असल्याचे म्हटले आहे. आताही कोकाटे यांनी आपल्यावरील निर्णयांचा इन्कार केला आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे अजित पवार म्हणाले.