
केंद्रिय अन्वेषण ब्युरोने मणिपूरमधील इंफाळ येथील कार्यालयात एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. इरोम बिशोरजित सिंह असे अधिकाऱ्याचे नाव असून त्याचा अधिक तपास सुरु आहे.
केंद्रिय अन्वेषण ब्युरोने मंगळवारी इंफाळ येथील ए अॅण्ड ई कार्यालयात तैनात असलेले वरिष्ठ लेखाकार इरोम बिशोरजित सिंह यांना 10 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
सीबीआय सुत्रांच्या माहितीनुसार, अधिकाऱ्याने एका कर्मचाऱ्याची MACP फाईल क्लिअर करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीची सीबीआयने दखल घेत सापळा रचला आणि ठरलेल्या किंमतीच्या अर्धी रक्कम घेताना म्हणजे 10 हजार घेताना अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. सध्या त्या अधिकाऱ्याचा तपास सुरु आहे.



























































