माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सुरक्षेत कपात

344

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देण्यात आलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. एसपीजी सुरक्षा काढण्यात आल्यानंतर मनमोहन सिंग यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने व्हीव्हीआयपी लोकांना सध्या देण्यात आलेल्या सुरक्षेची समीक्षा करण्यात आली होती. यामध्ये कोणत्या दर्जाची सुरक्षा संबंधित व्यक्तींना दिली पाहिजे याची माहिती घेऊन तसा निर्णय घेतला जातो. त्यानुसार मनमोहन सिंग यांच्या सुरक्षेत योग्य ते बदल करण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या