मराठा आरक्षणासह समाजाच्या अन्य मागण्यांसंदर्भात शब्द दिल्याने सर्वांगीण विचार करूनच राज्य सरकारला महिन्याची मुदत दिली आहे, असे स्पष्टीकरण मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी दिले.
मराठा समाजाचे प्रश्न महिन्यात मार्गी लावू असा शब्द मंत्री शंभुराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली समितीने दिल्यानंतर जरांगे-पाटील यांनी गुरुवारी आंदोलन स्थगित केले. यानंतर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे जरांगे-पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला एक दिवसही केळ देणार नव्हतो, पण मानसन्मान करावा म्हणून आणि आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकवायचे आहे असे मंत्र्यांनी सागिंतल्याने सरकारला महिन्याचा वेळ दिला, आता दगाफटका नको इतकेच त्यांना सांगितले, असेही जरांगे पाटील म्हणाले.
एसआयटी रद्द केल्याचे सांगितले जात आहे, परंतु त्यासंबधीचे पत्र अद्याप प्राप्त झालेले नाही हे स्पष्ट करून जरांगे-पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या तरुणाविरुद्ध दाखल केसेस मागे घेण्याबाबत सांगितले फडणकीस फोनकर बोलले, मात्र खरं काय माहीत नाही, कागद हाती आलेला नाही, असेही ते म्हणाले.