
सामना ऑनलाईन । पुणे
मराठा मोर्चाकडून ठिकठिकाणी करण्यात आलेल्या आंदोलनात अनेकांवर गुन्हे नोंदविण्यात आले. या आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्या. त्याचप्रमाणे आरक्षणासाठी आत्महत्या करणार्यांच्या कुटुंबीयांना नोकर्या द्या, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या 20 ऑगस्टपासून पुण्यात बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मराठा मोर्चा आंदोलनातील गुन्हे मागे घेऊ असे आश्वासन सरकारने दिले आहे. मात्र अद्यापही आंदोलनातील अनेक तरुण तुरुंगातच आहेत. यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चा तसेच सकल मराठा समाज या संघटनांची बैठक आज पुणे येथील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत पुण्यात बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



























































