गुरे, वाहने घेऊन ९ ऑगस्टला सहकुटुंब रस्त्यांवर बैठक!

12

सामना प्रतिनिधी । लातूर

मराठा आरक्षणासाठी शहर किंवा गावालगतच्या मुख्य रस्त्यावर गुरेढोरे, वाहने घेऊन गुरुवार, ९ ऑगस्ट रोजी सहकुटुंब बैठक देण्यात येणार असून हे जनआंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत ठरले आहे. राज्यातील सर्व समन्वयकांच्या सहमतीने आचारसंहिता तयार करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. लातूरच्या मराठा क्रांती भवनात शनिवारी रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. चर्चेनंतर आज निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. सकाळपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोकशाही मार्गाने हे आंदोलन करण्यात येणार आहे.

…आणि खासदार दानवे होडीतून नदीपार

पैठण : भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार राकसाहेब दानके यांना पैठण दौऱयात मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना कराका लागला. आंदोलकांना टाळण्यासाठी खासदार दानके हे चक्क होडीचा कापर करत गोदाकरीच्या दुसऱया काठाकर पोहोचले, परंतु आंदोलकांनी त्यांना तेथेही गाठले अन् प्रश्नांची सरबत्ती केली तेक्हा ‘मोठय़ा आकाजात बोलू नका. मीसुद्धा मराठा आहे असे आंदोलकांना दरडाकत त्यांनी ‘संयम बाळगा, सरकार मराठा आरक्षणाबाबत अनुकूल आहे’ अशी सारकासारक केली आणि पोलीस बंदोबस्तात काढता पाय घेतला.

मुलीच्या शिक्षणाची चिंता; तरुणाची छतावरून उडी

अर्धापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नांदेड जिह्यातील सावरगाव येथे गणपत आबादार या तरुणाने छतावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. मुलीच्या शिक्षणाची चिंता या तरुणाला सतावत होती. या घटनेनंतर सावरगाव पाटीवर दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लेखी आश्वासन हवे!

राज्य सरकारकडून वेळ मारून नेण्याची पद्धती अवलंबली जात आहे. मुख्यमंत्री वारंवार तेच तेच बोलत असून आता मेगाभरतीच्या स्थगितीची घोषणा करून आणखी एक गाजर दाखविण्याचा प्रयत्न आहे. ही घोषणा आता करून काय उपयोग आहे? ज्या तरुणांनी आपले प्राण दिले त्यांचे प्राण परत आणता येणार आहेत का? मुख्यमंत्र्यांकडून कोणतेही कालबद्ध आश्वासन देण्यात आलेले नाही. नोव्हेंबर या वर्षाचा की पुढच्या वर्षाचा याचाही कोठेच उल्लेख नाही. मेगाभरतीचे आश्वासन दिले जात आहे. जोपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेत नाहीत, लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत चर्चा नाही, असे प्रतिपादन सकल मराठा क्रांती मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांना फेसबुक पोस्ट टाकून तरुणाने पेटवून घेतले

सेलू : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फेसबुकवरून पोस्ट टाकून इंजिनीअरिंगच्या अनंत सुंदरराव लेवडे (२४) या पदविकाधारक तरुणाने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी येथे आज ही घटना घडली. नातलगांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मदतीचे आश्वासन मिळाल्यावर तणाव निवळला.

आपली प्रतिक्रिया द्या