
सामना ऑनलाईन । जुन्नर
राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वातावरण तापलेलं असताना जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे दोन आंदोलक थेट विजेच्या टॉवरवर जाऊन चढले आहेत. आंदोलक टॉवरवर चढल्याने दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे इतर आंदोलक आणि पोलिसांचीही तारांबळ उडाली आहे.
आंदोलकांनी टॉवरवर चढून सरकारचा जाहीर निषेध करत मोदी सरकारचे हेच का अच्छे दिन, ग्रामीण भागातील सर्व सामान्य शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार ? असा सवाल करत आयोगाने अहवाल सादर करून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण जाहीर करावे अशी मागणी केली आहे.
यादरम्यान आमच्या मागण्यांचे निवेदन जोपर्यंत वरीष्ठ पातळीवरील सरकारी आधिकारी येऊन स्वीकारत नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतल्यामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली आहे.
























































