
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण बसले आहेत. मराठा आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, “कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही.” माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, “मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. आडमुठ्या भूमिकेने तोडगा निघत नाही, चर्चेतून निर्णय होतो. कायदेशीर अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वेळ लागेल. कोर्टाच्या निर्णयांचा अवमान करुन चालणार नाही. कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही. यामुळे मराठा समाजाची फसवणूक होऊ शकते.”