आमदार सावे यांच्या कार्यालयासमोर थाळीनाद

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेल्या काही दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी ‘भीक नको हक्क हवा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’ असे फलक झळकावून जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलकांमध्ये महिलांचा समावेश होता.