विधेयक मंजूर… पण तोपर्यंत मराठा आंदोलन मागे घेणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र असे असले तरी विधेयकावर राज्यपालांची सही होत नाही, तसेच मराठा समाजातील तरुणांवरील गुन्हे जोपर्यंत मागे घेण्यात येणार नाही तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन घेणार नाही, अशी भूमिका आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांनी घेतली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाज बांधवांनी अत्यंत शिस्त आणि शांततेत मोर्चे काढले. त्यानंतर ठोक मोर्चे काढून पुन्हा आपल्या मागण्या सरकार पुढे ठेवल्या. त्यानंतर गेले 10 दिवस मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलक आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जात नाही तोपर्यंत आरक्षण मागे घेणार नाही, असे येथील आंदोलकांनी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.