आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर गेल्य़ा काही दिवसांपासून चर्चेत आहे. सई ताम्हणकर लवकरच ‘मानवत मर्डर्स’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजसाठी तिचे जोरदार प्रमोशन सुरू असून ती त्याकरता विविध फोटोशटूही शेअर करत आहे. तिने नुकतच एक फोटोशूट केले असून त्यात तिचा पाण्यातील बोल्ड लूक सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यात ती प्रचंड सुंदर दिसत असून चाहते तिच्या अदा पाहून फिदा आहेत.सईने मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही काम केले आहे. तिचा चाहता वर्गही मोठा आहे.