या मराठी अभिनेत्रीच्या घरी गोड बातमी, डोहाळ जेवणाचा व्हिडीओ केला शेअर

गेला काही काळ मनोरंजन सृष्टीकडून आनंदाच्या बातम्या मिळत आहेत. काहींनी यंदा सनई चौघडे वाजवत दोनाचे चार हात केले आहेत, तर काहींकडे छोट्या पाहुण्यांची चाहुल लागली आहे. या यादीत आता एका मराठी अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे.

जोगवा, अनुबंध, लाडाची मी लेक गं अशा विविध चित्रपट-मालिकांमधून प्रेक्षकांची लाडकी झालेली अभिनेत्री स्मिता तांबे हिच्या आयुष्यात एक छोटा पाहुणा येणार आहे. नुकताच डोहाळे जेवणाचा व्हिडीओ शेअर करून तिने ही बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

आपल्या आयुष्यातील हा सगळ्यात आनंदाचा क्षण असल्याचं तिने म्हटलं आहे. या तिच्या आनंदात तिच्या मैत्रिणी अभिनेत्री अमृता संत, अदिती सारंगधर, रेशम टिपणीस आणि नृत्यांगना फुलवा खामकरही सहभागी झाल्या आहेत. त्यांनी तिला फुलांच्या माळांनी सजवून तिच्यासाठी गाणंही म्हटल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-


View this post on Instagram

A post shared by Smita Tambe (@smitatambe)

आपली प्रतिक्रिया द्या