
मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 101 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे दोन मुली आहेत. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नांदी संमेलनात त्यांचा सत्कार करण्यात आला होता. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.
ज्यू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुषा रुबेन असे होते. त्यांची नाशिकमध्ये एका चित्रमंदिरात काम करणाऱ्या अझीझ अहमद इब्राहिम शेख (डॅडी शेख) या मुस्लिम तरुणाशी भेट झाली आणि १९५० साली त्यांनी शेख यांच्याशी विवाह केला. त्यांनी आपला धर्म बदलला नाही. पण जेरुषा रुबेन नाव बदलून त्या यास्मिन शेख झाल्या, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांना डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत.




























































