‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ येतोय भेटीला

824

स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शितकुलकर्णी चौकातला देशपांडेहा कौटुंबिक चित्रपट येत्या 22 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या सिनेमात सई ताम्हणकर, अभिनेते राजेश शृंगारपुरे आणि निखिल रत्नपारखी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत

चित्रपटातील भूमिकेबाबत राजेश म्हणाला, मी साकारलेल्या पात्राचे नाव आहेसतीश कुलकर्णीजो एका मुलाचा बाबा आहे. बायको नसल्यामुळे तो आणि त्याचा मुलगा, एवढंच त्यांचं कुटुंब आहे. मुलाला काय हवं नको ते सर्वकाही बघतो आणि दोघांमध्ये वडीलमुलाचं छान बाँडिंग आहे आणि त्याच्या आयुष्यात अशी एक स्त्री येते जिच्याशी मैत्रीचं आणि आपुलकीचं नातं तयार झालेलं असतं आणि ती स्त्री म्हणजे सई ताम्हणकर. सईसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल राजेश म्हणाला, सईसोबत पहिल्यांदाच काम केलं आहे. सोबत काम करताना सईचा स्वभाक समजला आणि मी मनापासून म्हणेन की सई खूप प्रोफेशनल आहे. सिनेमाची कथा ही  कौटुंबिक आहे. सध्याच्या या पुढारलेल्या विश्वामध्ये अनेकांची विचार करण्याची पद्धत बदलत गेली आहे. कुठे ना कुठे प्रत्येक व्यक्ती आधार शोधत असतोएक भावनिक आधार. कोणी तरी आपल्याला समजून घेईल असं अनेकांना वाटत असतं. असाच नातेसंबंधावर सिनेमा आधारित आहे

आपली प्रतिक्रिया द्या