आठ वर्षांनी मुक्ता-उमेश झळकणार एकत्र

‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘डबल सीट’, ‘जोगवा’ आदी दर्जेदार चित्रपटांतील सहजसुंदर  अभिनयामुळे मुक्ता बर्के महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचली. उमेश कामत हा तर तरुणींच्या गळ्यातील ताईतच. त्यानेही ‘टाईम प्लीज’, ‘लग्न पाहावे करून’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.  मुक्ता आणि उमेश यांनी ‘लग्न पाहावे करून’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तब्बल आठ कर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे, मात्र छोटय़ा पडद्यावरून. सोनी मराठीवर 12 जुलैपासून ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका सुरू होणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मालिकेच्या नाकातून ही एक प्रेमकथा आहे याचा अंदाज येतो. थोडी खुसखुशीत आणि अनेक रंगांनी भरलेली मीरा आणि आदी यांची ही प्रेमकथा प्रेक्षकांना नक्कीच आवर्षित करेल, यात शंका नाही.

आपली प्रतिक्रिया द्या