‘रावरंभा’ला चांगला प्रतिसाद

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला मराठी चित्रपट रावरंभा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. अनुप अशोक जगदाळे यांनी दिग्दर्शन केले असून, शशिकांत पवार यांनी निर्मिती केली आहे. जेष्ठ लेखक आणि कथाकार प्रताप गंगावणे यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. अभिनेता ओम भूतकर आणि मोनालीसा बागल यांनी राव आणि रंभा पात्र साकारले आहे. अमीत राज यांचे संगीत आणि गुरू ठाकूर, क्षितिज पटवर्धन यांची गीते या चित्रपटात आहेत. शॉवलीन मलेश यांची साहशी दृश्य अंगावर

रोमांच आणत आहेत. चित्रपटाच्या ऐतिहासिक काळातील सर्व रंगछटा, वास्तू, महाल, युद्धमैदानील परिणामकारकता, दृश्य भव्यता आभासी तंत्राने तयार केली आहे. चित्रपटाला अतिभव्यता देण्याचे काम व्हिएफएक्स तंत्रज्ञ जयेश मलकापुरे यांनी केले. अभिनेता संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, शशिकांत पवार, अशोक समर्थ, शिवम देशमुख, कुणाल मसले, आदर्श जाधव, विनायक चौगुले, अपूर्वा नेमलेकर, रोहित चव्हाण, किरण माने, यांच्यासह इतर कलावंतांनी उत्कृष्ठ अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे.