मराठीचं धाडसी पाऊल पडते पुढे! हिंदी चित्रपट घाबरतात, मराठी मात्र बिनधास्त थेट्रात झळकणार

लॉकडाऊननंतर थिएटर सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले तरी अद्यापही ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेझ कायम आहे. प्रेक्षक थिएटरकडे किती वळतील या भीतीने अद्यापही बॉलीवूडचे बडे निर्माते आपला चित्रपट रिलीज करण्याची हिंमत दाखवत नाहीत. अशातच मराठीचं धाडसी पाऊल मात्र पुढे पडताना दिसतंय. पुढील महिन्याभरात वैविध्यपूर्ण आशयांवरचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

प्रथमेश परबचा ओह माय घोस्ट हा चित्रपट 12 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. जम्पिंग टोमॅटो मार्पेटिंग आणि फिल्मोशन पिक्चर्सचा ओह माय घोस्ट हा हॉरर कॉमेडी जॉनरचा चित्रपट आहे. याची कथा अनाथ जग्गूभोवती फिरते. 22 जानेवारीला रिलीज होणाऱया पीटर या चित्रपटामध्ये अंधश्रद्धेसारखा संवेदनशील विषय हाताळला आहे. अंधश्रद्धेमुळे बळी गेलेल्या मित्राची भावनिक गोष्ट यात आहे. आनंदी एंटरप्रायझेसचा हा पहिलाच चित्रपट असून निर्मिती अमोल भावे यांची आहे.

पीटर – 22 जानेवारी
संत मारो सेवालाल – 5 फेब्रुवारी
ओह माय घोस्ट  – 12 फेब्रुवारी
प्रीतम – 19 फेब्रुवारी

आपली प्रतिक्रिया द्या