रसिकहो – दामले ब्रँण्डचं नवंकोरं नाटक

7703

>> क्षितिज झारापकर

तू म्हणशील तसं’. प्रशांत दामले. रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी. नव्याला संधी हे या ब्रँडचं वैशिष्टय़. नव्या दमाच्या तरुणाईने सादर केलेला हा उल्लेखनीय प्रयत्न.

रंगकर्मींना धंदा कळला की, मग ते निर्मितीकडे वळतातसर्वप्रथम स्वतःचा ब्रॅण्ड निर्माण करतात आणि मग तो ब्रॅण्ड विकू लागतात. हिंदीत अक्षय कुमार, अजय देवगण, सलमान खान ही याची ठळक उदाहरणं आहेत. पण या तिघांनी स्वतःचा ब्रॅण्ड बनवता स्वतःलाच ब्रॅण्ड बनवलं. करण जोहर आणि विधू विनोद चोप्रा हे दोन रंगकर्मी असे आहेत ज्यांनी स्वतःचा ब्रॅण्ड बनवला. तसंच काहीसं मराठी रंगभूमीवर सध्या चालू आहे. अभिनेत्यांचा ब्रॅण्ड या पहिल्या सदरात मोडणारी दोन नावं आहेत भरत जाधव आणि प्रशांत दामले. पैकी प्रशांत दामले हे दुसऱया सदरातदेखील पाऊल ठेवून आहेत. त्यांच्या प्रशांत दामले फाऊंडेशनतर्फे सध्या एक नाटक सुरू आहे ज्यात दस्तुरखुद्द प्रशांत दामले नाहीत. गौरी थिएटर्स आणि पुणे टॉकीज यांच्या संयुक्त विद्यमातून निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंंडेशन प्रस्तुत हे नवीन नाटक आहेतू म्हणशील तसं’.

दोनेक वर्षांपूर्वी आलेल्या दामल्यांच्यासाखर खाल्लेला माणूसया नाटकात काम करणाऱया तरुण रंगकर्मी संकर्षण कऱहाडे याने लिहिलेलंतू म्हणशील तसंहे नाटक आहे. संकर्षण एक अभिनेता आणि निपूण निवेदक म्हणून ओळख असलेला रंगकर्मी आहे. पण हल्ली महविद्यालयीन दशेत रंगकर्मींना नाटय़कलेचा सर्वांगीण विकास घडवून घेण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. नवीन येणारे रंगकर्मी हे हुशारीने याचा फायदा घेऊन स्वतःला प्रगल्भ करून घेत असतात. संकर्षणने आपल्या अभिनयाबरोबरच लेखनाचं अंगदेखीलतू म्हणशील तसंच्या निमित्ताने लोकांपुढे आणलं आहे. ‘तू म्हणशील तसंही एका आजच्या तरुण जोडप्याच्या आयुष्याची कॉमेडी आहे. एकाच बँकेत काम करणाऱया नवराबायकोची गोष्ट. बॉस आणि सबॉर्डिनेट हे रोल्स घर आणि ऑफिस या दोन ठिकाणी आलटून पालटून असल्याने उडालेली भंबेरी आणि त्यातून घडणारी गंमत असातू म्हणशील तसंया दोन अंकी नाटकाचा गाभा आहे.

खरंतर आजच्या दुनियेत हे कधीही आणि कुणासोबतही घडू शकेल असं सत्य आहे. आजची तरुण पिढी ही अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे, हुशार आहे आणि खूप कर्तबगार आहे. नवरा आणि बायको या दोघांचं करीयर महत्त्वाचं आहे  हे आता हळूहळू पटू लागलंय. अशात आपल्या नवरा, बायको, घर, ऑफिस, बॉस, सबॉर्डिनेट यासकट आपली इमेज आणि रुतबा या सगळ्याचाचं वेगळा विचार व्हायला हवा हा मुद्दा संकर्षण कऱहाडे यानेतू म्हणशील तसंमध्ये मांडलाय. हा विषय तसा गंभीर आहे, पण संकर्षणने तो खूपचं मार्मिक पध्दतीने उतरवलाय. लिखाणात चटपटीतपणा असल्याने हे नाटक मनोरंजक व्यावसायिक नाटक बनतं. नाटकात घडणाऱया घटना आणि त्यांची मांडणी, पात्रांचं व्यक्तिरेखन हे सगळं प्रेक्षकांना हसवत हसवत एक मुद्दा पोहोचवणारं आहे आणि त्याबद्दल संकर्षण कऱहाडे याला शाबासकी दिली पाहिजे.

तू म्हणशील तसंया नाटकाचं दिग्दर्शन एका अशा रंगकर्मीने केलं आहे ज्याची ओळख आपल्याला अभिनेता म्हणून अधिक आहे. डाव्हर्सिफिकेशनच्या या हंगामात सध्या हा रंगकर्मीदेखील आपलं दिग्दर्शक म्हणून ब्रॅण्डिंग करतोय. ‘तू म्हणशील तसंपाहून हा एक परिपूर्ण दिग्दर्शक नक्कीच आहे हे निश्चित दिसून येतं. हा दिग्दर्शक आहे प्रसाद ओक. प्रसादनेतू म्हणशील तसंहे इतकं वेगवान योजलंय की, पाहताना आपल्याला उसंत नसते. त्याने नेपथ्य बदलासाठीदेखील वेळ दवडला नाहीये. कलाकार स्टेजवरच वेशभूषा बदलतातम्हणजे पुरुष पात्र. एका फ्लोमध्ये प्रसाद हे नाटक नेत जातो आणि आपण प्रेक्षकही त्याच्याबरोबर कदम दर कदम सरकत जातो. नाटकाची परिणामकारकता प्रसादच्या स्तुत्य दिग्दर्शनातून वाढत जाते.

नेपथ्य बदलासाठी दिग्दर्शक वेळ देत नाही तेव्हा नेपथ्यकाराचं काम खूप कठीण होतं. इथे प्रदीप मुळ्येंचा सगळा एक्सपीरियन्स कामी येतो. सभोवतालच्या सगळ्यांना कामाला लावण्याची प्रसाद ओक यांची जुनी खोड या नाटकातही आहे. प्रदीप मुळ्ये यांनी नेपथ्य असं काही बेतलं आहे की, सिनेमात ज्या प्रमाणे दोन दृश्यांमध्ये वाईप वापरतात तो फील आपल्यालातू म्हणशील तसंपाहताना मिळतो. बॅकस्टेजचे सगळे रंगकर्मी हे युनिफॉर्म घालून प्रकाशात येऊन नेपथ्य बदलतात आणि हे कुठेही खटकत नाही हे प्रदीप आणि प्रसादचं श्रेय आहे. अशोक पत्कींचं संगीत ही नाटकाला मनोरंजक करण्यात महत्त्वाचं आहे. दर्शनी नेपथ्य बदलासाठी एक छोटीशी थीमदेखील योजण्यात आली आहे.

कोणत्याही नाटकात कलाकार सर्वात महत्त्वाचे असतात, कारण ते नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. इथेतू म्हणशील तसंजिंकतं. सूत्रधार म्हणून अमोल कुलकर्णी नाटक त्यातील सर्व वेगळ्या क््प्त्यांसह आपल्याला उलगडून सांगतो. अमोल हा एक उत्तम रंगकर्मी आहे. त्याचं चि. सौ. का. रंगभूमी हे व्यावसायिक आणि लोकोमोशन हे प्रायोगिक या दोन्ही नाटकांत काम खूपचं छान झालं होतं. इथेही अमोलतू म्हणशील तसंला व्हॅल्यू ऑडिशन करतो. प्रिया करमरकर ही अभिनेत्रीदेखील आपलं पात्र खूपच छान वठवते. खुद्द संकर्षण कऱहाडे गौरव मस्त रंगवतो. या पात्राचा दिलखुलासपणा आणि निरागसता संकर्षण व्यवस्थित सादर करतो. अदितीच्या भूमिकेत भक्ती देसाई त्याला बॅलन्स्ड साथ देते. अदितीची दोन व्यक्तिमत्त्वातली कन्फ्यूझन भक्ती कमालीच्या सहजते दाखवते. हे सांभाळताना भक्तीचं कॉमेडीचं टायमिंग कुठेही सुटत नाही हे विशेष.

एकंदरीत प्रशांत दामले या ब्रॅण्डचं प्रशांत दामले नसलेलंतू म्हणशील तसंहे एक अत्यंत मार्मिक, हलकंफुलकं नाटक आहे.

 • नाटक  – तू म्हणशील तसं
 • सादरकर्ते –  प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन
 • निर्मिती  –  गौरी थिएटर्स
 • निर्माती  –  गौरी दामले
 • प्रस्तुती  –  पुणे टॉकीज
 • लेखक   – संकर्षण कऱहाडे
 • नेपथ्य  – प्रदीप मुळय़े
 • प्रकाश  – किशोर इंगळे
 • गीत, संगीत –     अशोक पत्की
 • नृत्य   –  मयूर वैद्य
 • वेशभूषा –           श्वेता बापट
 • दिग्दर्शक –         प्रसाद ओक
 • कलाकार   –        भक्ती देसाई, प्रिया करमरकरगौरव कुलकर्णी, अमोल कुलकर्णी, संकर्षण कऱहाडे
 • दर्जा – ***
आपली प्रतिक्रिया द्या