शिवाजी महाराजांच्या भूमिकेत भूषण प्रधान

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्तीसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका 2 मेपासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर सुरु होत आहे.

ही मालिका नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, आदी लढवय्यांच्या शौर्याला अर्पण असेल. अभिनेता भूषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार आहे. भूषण म्हणाला, ‘छत्रपती शिवाजी महाराज साकारणं हे प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. माझंदेखील स्वप्न पूर्ण होत आहे. जबाबदारीचं भान आहे. त्यामुळे उत्सुकता आणि धाकधुक वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या