मार्क टुली यांचे निधन

हिंदुस्थानच्या इतिहासाचे साक्षीदार, प्रसिद्ध लेखक व ज्येष्ठ पत्रकार मार्क टुली यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे चार दिवसांपूर्वी त्यांना उपचारांसाठी दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्बल 30 वर्षे टुली हे बीबीसीचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर 20 वर्षे त्यांनी स्वतंत्र पत्रकारिता केली.

पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना ‘पद्मश्री’ व ‘पद्मभूषण’ने सन्मानित करण्यात आले होते. 1985 मध्ये त्यांना ‘ऑफिसर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर’ हा मान मिळाला होता. त्याशिवायदेखील त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते.