कोरोना काळात लग्नाचा ट्रेंड बदलला, कुणाला हळदीचे, तर कुणाला वरातीचे निमंत्रण!

कोरोना काळात लग्नसमारंभांचा ट्रेंड बदलला आहे. अनेकांनी ’ऑनलाईन शुभमंगल’चा मार्ग निवडला आहे. तसेच नातेवाईक, मित्रमंडळींनीही प्रत्यक्ष हजर राहावे, यासाठी नवनव्या क्लृप्त्या लढवल्या गेल्या आहेत. कुणाला हळदीचे, तर कुणाला वरातीचे निमंत्रण दिले जात आहे, जेणेकरून वेगवेगळ्या विधींना वेगवेगळे पाहुणे हजर राहतील व सरकारी नियमानुसार गर्दी टाळता येईल.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांत वऱहाडींच्या संख्येला 50, 100 किंवा 200 अशी मर्यादा घालण्यात आली आहे. या बंधनांचे पालन करीत वधू-वर विवाहबंधनात अडकत आहेत. लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्नाचा बार आता उडवून द्यायचाच, असा पक्का निर्धार वधू-वर पक्षांनी केला आहे. लग्नाला आपल्या सर्व पाहुणे मंडळींना बोलवायचे, मात्र कुठल्याही एका विधीला मोठी गर्दी करायची नाही, अशाप्रकारे नियोजन केले जात आहे. याच अनुषंगाने विधीनुसार पाहुणे मंडळी निश्चित करून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या लग्नपत्रिका छापल्या जात आहेत. हळद, पुण्यवचन, लग्नाचा मुख्य विधी, रिसेप्शन, वरात अशा वेगवेगळ्या समारंभांनुसार पाहुण्यांची यादी बनवून तशा निमंत्रण पत्रिका वाटल्या जात आहे.

पाहुण्यांच्या घरी स्नेहभोजनाची डिलिव्हरी

स्थानिक पातळीवरच्या पाहुण्यांच्या घरी स्नेहभोजनाची डिलीव्हरी केली जात आहे. कोरोना महामारीमुळे ही नवीन परंपरा सुरू झाली आहे. वधू-वर पक्ष आम्हाला कॅटरिंगची ऑर्डर देत असतानाच पाहुण्यांना जेवणाची पाकिटे घरपोच करण्याचीही मागणी करीत आहेत. त्या अनुषंगाने आम्हाला स्वतंत्र पॅकेजची सुरुवात करावी लागली आहे, असे कॅटरिंगचे काम करणाऱया सोहन सिंह यांनी सांगितले.

जवळपास 60 टक्के लग्नांच्या ‘लाईव्ह टेलिकास्ट’ची ऑर्डर

जे वयस्कर नातेकाईक लग्नसमारंभात प्रत्यक्ष हजर राहू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ’लाईक्ह टेलिकास्ट’ची व्यवस्था केली जात आहे. यासाठी लग्नपत्रिकेत विशिष्ट लिंक दिली जात आहे. तसेच लग्नासाठी बनवलेल्या विशेष क्हॉटसऍप ग्रुपवर ’लाईक्ह टेलिकास्ट’साठी पासवर्ड पाठवला जात आहे. जवळपास 60 टक्के लग्नसमारंभांमध्ये ही विशेष व्यवस्था केली जात आहे, असे निरीक्षण एका सिनेमॅटोग्राफरने नोंदवले.

जोडप्याने वेडिंग रिंगला शोधला भन्नाट पर्याय
एक दुसऱयाला अंगठी घालून जीकनभर एकत्र राहण्याचे वचन दिले जाते. परंतु अंगठी घालणे काहींना अजिबात आकडत नाही. अशाच एका जोडप्याने आपली कमिटमेंट दाखकण्यासाठी लग्नाच्या अंगठीला भन्नाट पर्याय शोधला आहे. या जोडप्याने अंगठी घालण्याऐवजी एकमेकांच्या आयफोनचे सिम ट्रे अदलाबदली केले आहेत. कॅसी नैस्टाट या तरूणाने नुकतेच दोन आयफोनचे फोटो शेयर केले होते. यात लाल रंगाच्या आयफोनला सिल्क्हर रंगाचा सिम ट्रे तर सिल्व्हर रंगाच्या आयफोनला लाल रंगाचा सिम ट्रे दिसतोय. हा फोटो ट्वुट करत कॅसी म्हणाला, ’मला आणि माझ्या पत्नीला अंगठी घालणे आवडत नाही. त्यामुळे आम्ही आमची कमिटमेंट दाखवण्यासाठी एकमेकाच्या आयफोनचे सिम ट्रे बदलले आहेत.’ या जोडप्याच्या या आयडिच्या कल्पनेचे सोशल मिडियावर भरभरून कौतुक होतेय

आपली प्रतिक्रिया द्या