कोरोनाची लस घेऊनच नवरी चढली बोहल्यावर; लोकांनी केला कौतुकाचा वर्षाव !

कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लसीकरणात वाढ होत आहे. लोकांनाही लस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे, मात्र लसीकरणाचे महत्त्व एका नवरीच्या भलतेच लक्षात आले आहे. ती चक्क लग्नाच्या दिवशी वेडिंग गाऊनवरच कोरोनाची लस घ्यायला गेली. त्यानंतर बोहल्यावर चढली.

अमेरिकेतील बाल्टीमोर शहरात राहणाऱ्या या तरुणीचे नाव ‘सारा’ असे आहे. लस घेण्याची जेव्हा तिची वेळ आली तेव्हा ती वेडिंग गाऊनमध्ये होती. तरीही सारा लस घेण्यासाठी आधी लसीकरण केंद्रावर पोहोचली. लस घेतल्यानंतर तिचा विवाह सोहळा पार पडला.

लग्नाच्या दिवशीही लस घ्यायला तिने प्राधान्य दिले यामुळे मैरीलँड विश्वविद्यालयाच्या क्लिनिककडून साराची काही छायाचित्रे ‘इथे नवरी येते’ या फोटोओळीसह समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली आहेत.

लोकांनीही मोठ्या संख्येने या छायाचित्रांना लाईक केले असून ‘खूपच छान! दुसऱ्यांना हे प्रोत्साहन देणारे आहे.’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या