खानाखजाना : मसाले भात

399

साहित्य : (मसाल्याकरिता) धणे, १ स्टार फूल, थोडेसे लवंग, १ दालचिनीचा तुकडा. (भातासाठी) १ चमचा तेल, मोहरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा, १ चमचा आलं पेस्ट, २ हिरव्या मिरच्या, हळद, गोडा मसाला, लाल तिखट, फ्लॉवर, मध्यम आकारात चिरलेले बटाटे, गाजर, टोमॅटो, शेंगदाणे, २ कप तांदूळ, पाऊण कप पाणी, चवीनुसार मीठ, तूप, चिरलेली कोथिंबीर, खवलेलं खोबरं.

कृती : सर्वप्रथम धणे, स्टार फूल, लवंग, दालचिनीचा तुकडा ४-५ मिनिटे मध्य आचेवर हलका रंग येईपर्यंत परतून घ्यावा. नंतर मिक्सरमध्ये जाडंभरडं वाटून घ्यावा. मसालेभाताची फोडणी करण्यासाठी गॅसवरील पातेल्यात दोन चमचे तेल गरम करून घ्यावे. त्यामध्ये मोहरी, जिरं, चार-पाच तमालपत्र तेलात परतवावीत. नंतर बारीक चिरलेला कांदा थोडासा मऊसर होईपर्यंत परतावा. यामध्ये किसलेलं आलं, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद आणि गोडा मसाला घालून मिनिटभर परतवावं. गोडा मसाला तिखटापेक्षा जास्त घालावा. त्यानंतर बटाटा आणि फ्लॉवरचे तुकडे घालावेत. हे एकत्र करून झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवून घ्या. यामध्ये पाणी घालू नये फक्त वाफवून घ्यावे. नंतर गाजर, श्रावणी घेवडा, तोंडली, मटार, टोमॅटो, थोडेसे कच्चे शेंगदाणे घालून पुन्हा नीट ढवळून घ्यावं. आता एक कपभर सुरती कोलम तांदूळ धुऊन घाला. यामध्ये एक कप तांदळाला पाऊण कप पाणी घाला. चवीनुसार मीठ व वाटलेला गरम मसाला घाला. मोठय़ा आचेवर उकळी येऊ द्यावी. मग आवडीनुसार चमचाभर साजूक तूप घालावे. झाकण ठेवून आणि मंद आचेवर मसाले भात शिजू द्यावा. शिजलेला मसाले भात व्यवस्थित परतून घ्यावा, जेणेकरून त्यातील मसाला आणि भाज्या एकजीव होतील. सर्व्ह करताना वरून साजूक तूप, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालावं

आपली प्रतिक्रिया द्या