गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातून एक किळसवाणा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक सलून मालक आपल्या थुंकीचा वापर करून नागरिकांच्या चेहऱ्य़ावर मसाज करायचा. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांनी त्या सलून मालकाला अटक केली. यासोबत आता त्य़ाच्या सलूनवरही कारवाई करण्यात आली आहे.
युसूफ असे त्या सलून मालकाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील कन्नोजचा रहिवाशी आहे. कन्नोजमध्ये युसूफ स्वत: चे सलून चालवायचा. येथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला तो त्याच्या थुंकीने चेहऱ्यावर मसाज करायचा. दरम्यान त्याच्या या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे सोशल मीडिया यूजर्स संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसात युसूफ विरुद्ध तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत युसूफला अटक केली.
दरम्यान आता युसूफचे सलून सरकारी जागेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून बांधण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आाता नगर पंचायत समितीने मोठी कारवाई केली आहे. यूपीच्या नगर पंचायत समितीने युसूफच्या बेकायदा अतिक्रमण केलेल्या सलूनवर बुलडोझर फिरवला.