रामरक्षा आंदोलनाला लोटली अलोट गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील लुटमारीचा तीव्र निषेध करत शिवसेनेच्या वतीने कांदिवली पश्चिमेतील काळा हनुमान मंदिर येथे रामरक्षा पठण, महाआरती आणि निषेध आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले. यावेळी अलोट गर्दी लोटली होती.

विभागप्रमुख संतोष राणे, मनाली चौकीदार यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, महिला विभाग संघटक शुभदा शिंदे, विधानसभाप्रमुख राजू खान, पैलास कणसे, संतोष धनावडे, नगरसेवक अंकित प्रभू, सचिन पाटील, धर्म कळे, गीता भंडारी, योगिता कदम, पुष्पा कळंबे, सिनेट मेंबर शशिकांत झोरे, मिलिंद साटम, महिला विधानसभाप्रमुख सुषमा कदम, विधानसभा संघटक राजन निकम, सत्यवान वाणी, उप विभाग प्रमुख आशीष पाटील, श्याम मोरे, अनंत नागम, शाखाप्रमुख निखिल गुडेकर, रवींद्र मर्ये, राजा पवार, सुनील राणे, विजय मालुसरे, राजू शिंदे यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.