
बस किंवा ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याच्या आपण अनेक घटना बघतो. परंतु सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय यात चक्क किमान प्रवासादरम्यान प्रवाशांमध्ये प्री स्टाईल हाणामारी झाल्याचे दिसत आहे. विमान मॅंचेस्टरवरून ऍमस्टरडॅमला जात असताना हा प्रकार घडला. त्यांच्यामध्ये नेमका वाद कशावरून सुरू झाला यामागचे कारण कळले नसले तरी या घटनेमुळे सहप्रवाशांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली. शेवटी क्रू मेंबरने मध्यस्ती करून हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. विमान मॅंचेस्टरवरून ऍमस्टरडॅमला जात असताना हा प्रकार घडला.




























































