माथेरानच्या राणीची पुन्हा घसरगुंडी, जुम्मापट्टी स्थानकाजवळ इंजिन उतरले

35

सामना ऑनलाईन । कर्जत

वॉटर पाइपलाइनजवळ 15 दिवसांपूर्वीच रुळावरून इंजिन उतरले असतानाच बुधवारी पुन्हा जुम्मापट्टी स्थानकाजवळ माथेरानची राणी घसरली. या घसरगुंडीने भरउन्हाच्या तडाख्यात शेकडो पर्यटकांना पाच किलोमीटर पायपीट करावी लागली. टॉयट्रेनच्या या बेभरवशी कारभारामुळे माथेरानच्या थंड हवेची झुळूक अंगावर घेण्यासाठी येणाऱ्या हजारो पर्यटकांचा चांगलाच घामटा निघत आहे.

माथेरानहून नेरळ स्थानकात येण्यासाठी निघालेल्या माथेरान राणीने पुन्हा एकदा जुम्मापट्टीजवळ ‘मान’ टाकली. जुम्मापट्टी स्थानकादरम्यान 11.30 च्या सुमारास माथेरान राणीचे 407 हे इंजिन रुळाकरून घसरले. राणीला रुळाकर पूर्ककत आणण्यासाठी केळ लागत असल्याने प्रकाशांनी तब्बल पाच कि.मी. जंगलातील पायवाट तुडवत मार्ग काढला. मुख्य रस्त्याकर येताच पर्यटकांनी मिळेल त्या काहनांना हात करत अतिरिक्त पैसे मोजून आपला प्रकास केला.

डोक्यावर सामान… कडेवर मूल
माथेरानच्या निसर्गाची लयलूट करण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा परतीचा प्रवास मात्र चांगलाच डोकेदुखीचा ठरला. अनेकांनी आपले चंबूगबाळ डोक्यावर मारत मुलांना कडेवर घेऊन जंगलाची वाट तुडवली. पर्यटकांची झालेली ही अवस्था पाहून काही रहिवाशांनी रस्त्यावर पाण्याची व्यवस्था करून तहान भागवली. त्यामुळे हायसे वाटलेल्या प्रवाशांनी राणीच्या नावे ‘बोटे’ मोडत नेरळ गाठले.

आपली प्रतिक्रिया द्या