Video – रेल्वे पुलावर तरुणीला एकटे गाठून घेतले चुंबन, विकृताला अटक

माटुंगा रेल्वे स्थानकाच्या पुलावर अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वे स्थानकाच्या पुलावर तरुणीला एकटे गाठून एका विकृताने तिचे बळजबरीने चुंबन घेतले आणि तिचा विनयभंग केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांनी त्या विकृताला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 26 जानेवारीच्या दुपारी घडल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणी मांटुगा रेल्वे स्थानकाच्या पुलावरून जात असताना एक विकृत पाठीमागून येतो आणि तिचे चुंबन घेतो. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पीडिता घाबरते आणि तिथून पळ काढते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

दरम्यान, माटुंगा रेल्वे स्थानकाच्या पुलावर अशा घटना वारंवार घडत असल्याचे समोर आले आहे. विकृत आणि गर्दुल्यांची संख्या वाढत चालल्याने विनयभंगाच्या तक्रारीही वाढल्या आहेत. रेल्वे स्थानकाच्या पुलावरील घटना समोर आल्यानंतर तरुणींनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विकृताला अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या