हाथरसप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा, बसपा नेत्या मायावती यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mayawati

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावर संपूर्ण देशात आक्रोश आहे. सुरुवातीच्या तपासातून समोर आलेल्या माहितीतून लोकं समाधानी नाहीत. त्यामुळे या घटनेची सीबीआय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी मागणी बसपा नेत्या मायावती यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

मायावतींनी आणखी एक ट्विट करत राष्ट्रपतींनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. देशाचे राष्ट्रपतीही उत्तर प्रदेशचे आहेत. ते ही दलित आहेत. त्यामुळे त्यांनी सरकारने पीडित कुटुंबासोबत केलेल्या अमानवीय वर्तन लक्षात घेऊन या प्रकरणात योग्य न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.