कसोटी क्रिकेटही होणार थरारक, एमसीसीने दिला प्रस्ताव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लंडन

कसोटी क्रिकेटची घटलेली लोकप्रियता बघता क्रिकेटच्या या सर्वात जुन्या फॉरमॅटला अधिक थरारक बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. क्रिकेटचे नियम बदलणारी संस्था मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) वर्ल्ड क्रिकेट कमिटीने कसोटी क्रिकेटला अधिक रोमहर्षक बनविण्यासाठी काही प्रस्ताव दिले आहेत.

‘एमसीसी’ने आपल्या प्रस्तावात कसोटी क्रिकेटमधील वाया जाणारा वेळ वाचविण्यासाठी शॉट क्लॉक, कसोटी स्पर्धेत सुरुवातीला मानक बॉल आणि नो बॉलवर फ्री हीट देण्याचा नियम बनविले आहेत. बंगळुरूमध्ये मागील आठवड्यात इंग्लंडचे माजी कर्णधार माइक गॅटिंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक झाली होती. या बैठकीत कसोटी क्रिकेटमधील बदलाबाबत काही सूचना करण्यात आल्या. या समितीत हिंदुस्थानचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांचाही समावेश आहे. कसोटी क्रिकेट हे अतिशय संथ आणि कंटाळवाणे वाटत असल्याने क्रिकेटप्रेमी या फॉरमॅटपासून दूर जात आहेत.