मॅकडोनाल्‍ड्स इंडियाकडून ग्राहकांसाठी कॉन्‍टॅक्‍टलेस टेक-आऊट सेवा सादर

472

हिंदुस्थानात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथील केला जात आहे. सरकारने परवानगी दिल्यानंतर प्रसिद्ध मॅकडोनल्डने देखील त्यांची कॉन्टॅकलेस टेक आऊट सेवा सुरू केली आहे. पश्चिम व दक्षिण हिंदुस्थानात मॅकडोनाल्‍ड्सची मालकी असलेली आणि कार्यसंचालन पाहणारी कंपनी वेस्‍टलाइफ डेव्‍हलपमेंटने स्‍थानिक सरकारच्‍या नियमांचे पालन करत निवडक शहरांमध्‍ये कॉन्‍टॅक्‍टलेस स्‍टोअर टेक-आऊट सेवा सुरू केली आहे.

हा उपक्रम अत्यावश्‍यक सेवा देण्‍यासाठी घराबाहेर पडणा-या ग्राहकांना सोयीस्‍करपणे सुरक्षित फूड पिक-अप पर्याय देण्‍यासाठी सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा भाग म्‍हणून ग्राहक मॅकडिलिव्‍हरी अॅपवरील त्‍यांच्‍या पसंतीच्‍या स्‍टोअर लोकेशनवर त्‍यांचे पिक-अप ऑर्डर्स देऊ शकतात, ऑनलाइन पेमेण्‍ट करू शकतात आणि घरी जाताना किंवा कामावर जाताना रेस्‍तराँ पिक-अप काऊंटर्सवरून ऑर्डर पिक-अप करू शकतात. ऑर्डर देण्‍यापासून घेण्‍यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पूर्णत: सुरक्षित, कॉन्‍टॅक्‍टलेस आहे आणि या प्रक्रियेदरम्‍यान सोशल डिस्‍टन्सिंगचे देखील पालन केले जाते.

या घोषणेबाबत बोलताना वेस्‍टलाइफ डेव्‍हलपमेंटच्‍या संचालक स्मिता जाटिया म्‍हणाल्‍या, ”आम्‍ही आमच्‍या ग्राहकांच्‍या सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य देतो आणि भविष्‍यात देखील देत राहू. या कॉन्‍टॅक्‍टलेस टेक-आऊट सेवेच्‍या सादरीकरणाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही आवश्‍यक सेवा देण्‍यासाठी बाहेर पडणा-या ग्राहकांना सुरक्षित व आरोग्‍यदायी फूड सोयीस्‍करपणे मिळण्‍याची सुविधा देत आहोत. सद्यस्थिती पाहता आम्‍ही आमच्‍या कार्यसंचालनांमध्‍ये सुरक्षितता व स्‍वच्‍छताविषयक प्रक्रिया अधिक वाढवल्‍या आहेत, तसेच आमचे भागीदार, पुरवठादार व डिलिव्‍हरी समूह प्रक्रियांमधील नियमांचे काटेकोरपणे पालन करत असल्‍याची खात्री देखील घेतली आहे.” कंपनी कॉन्‍टॅक्‍टलेस डिलिव्‍हरी सादर करणा-या पहिल्‍या क्‍यूएसआर ब्रॅण्‍ड्सपैकी एक होती. आज कंपनी आपल्‍या १५० हून अधिक डिलिव्‍हरी केंद्रांमधून डिलिव्‍हरी सेवा देत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या