एमडी ड्रग्जचे कनेक्शन छोटा राजन टोळीपर्यंत, एका नायजेरीयनसह 14 आरोपी गजाआड

पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन आठवडय़ापूर्वी चाकण येथे जप्त केलेल्या 20 कोटी मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज प्रकरणाचे कनेक्शन छोटा राजन टोळीपर्यंत पोहोचले आहे.

याप्रकरणात पोलीसांनी छोटा राजन टोळीत पूर्वी सक्रीय असलेला सराईत गुन्हेगार आणि एका नायजेरियन व्यक्तीसह चौदा जणांना अटक केली आहे. या आरोपींनी रांजणगाव येथील एका बंद पडलेल्या फार्मा कंपनीत तब्बल 132 कोटी किमतीचे 132 किलो एमडी ड्रग्ज तयार केल्याचे समोर आले आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त राजाराम पाटील, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, श्रीराम पौळ आदी उपस्थित होते.

या प्रकरणात मुख्य सूत्रधार तुषार सुर्यकांत काळे  आणि राकेश श्रीकांत खानिवडेकर उर्फ रॉकी आणि नायजेरियन व्यक्ती झुबी इफनेयी उडोको यांच्यासह किरण राजगुरू, अशोक संकपाळ, किरण काळे, पुलदीप इंदलकर, ऋषीकेश मिश्रा आणि जुबेर मुल्ला अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या गुल्ह्यात यापूर्वी चेतन दंडवते, आनंदगीर गोसावी, अक्षय काळे, संजिवपुमार राऊत आणि तौसिफ तस्लीम या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती पाहून पोलीस आयुक्तांनी सहा तपास पथके स्थापन केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या