दंत अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील दंत चिकित्सा संस्थांमध्ये पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमांच्या (नीट एमडीएस 2021) प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणी संदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवार एमएचसीईटीच्या mahacet.org या वेबसाईटवर संपर्क साधू शकतात. तसेच ऑनलाइन अर्जदेखील करू शकतात.

सर्व नोंदणीकृत किंवा पात्र उमेदवारांना पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्टदरम्यान सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. उमेदवारांनी सादर केलेली माहिती ‘नीट एमडीएस 2021’साठी महाराष्ट्र राज्य अस्थायी गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी वापरली जाईल. प्रवेशापूर्वी प्रत्येक फेरीदरम्यान प्रवेशासाठी कॉलेजस्तरावर प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पार पडेल.

असे असेल वेळापत्रक

  • ऑनलाइन नोंदणी – 26 ते 29 ऑगस्ट
  • आवश्यक कागदपत्रे सादरीकरण – 26 ते 30 ऑगस्ट
  • आसन क्रमांक जाहीर – 27 ऑगस्ट
  • ऑनलाइन पसंती अर्ज भरण्याची प्रक्रिया – 27 ते 31 ऑगस्ट
  • तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित – 2 सप्टेंबर
  • पहिली निवड यादी – 4 सप्टेंबर
  • पहिल्या कॅप फेरीसाठी प्रवेशाची अंतिम मुदत – 9 सप्टेंबर