
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
शनिवारपासून सुरू होणाऱ्या २०१८ च्या एशियन गेम्समध्ये हिंदुस्थानी खेळाडू जी पदकं मिळवतील ती सर्व पदकं स्वर्गीय अटलजी यांना समर्पित होणार आहेत. ही माहिती हिंदुस्थानचे शेफ दे मिशन (खेळाडूंचे प्रमुख) ब्रीजभूषण शरण सिंग यांनी दिली आहे. १६ ऑगस्ट रोजी हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान आणि राजकारणातले भीष्म पितामह असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ खेळाडू आपली पदक अटलजींना समर्पित करणार आहेत.
All the medals which will be won by the Indian athletes in #AsianGames2018 will be dedicated to the former Prime Minister #AtalBihariVajpayee: Chef de Mission (CDM) Brij Bhushan Sharan Singh to ANI (file pic) pic.twitter.com/ex16bq6dDj
— ANI (@ANI) August 17, 2018
जकार्ता येथे भरणाऱ्या यंदाच्या एशियन गेम्स स्पर्धांमध्ये हिंदुस्थानकडून ५७१ खेळाडू पाठवण्यात आले आहेत. १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत हिंदुस्थानचे अनेक नामवंत खेळाडू उतरणार आहेत. यांपैकी बजरंग पूनिया, सुशील कुमार, विनेश फोगट, पी. व्ही. सिंधू, हिमा दास, मनु भाकेर, दीपा कर्माकर या खेळाडूंकडून पदकाच्या आशा उंचावल्या आहेत.

























































