मेधा पाटकर यांच्यावर फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप, पासपोर्ट कार्यालयाची नोटीस

432

नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मुंबईतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांनी पासपोर्टसाठी अर्ज करताना फौजदारी गुह्यांची माहिती लपवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पासपोर्ट जप्त का करू नये, अशी विचारणा कार्यालयाने नोटिशीद्वारे केली आहे. मेधा पाटकर यांच्याविरोधात नऊ फौजदारी गुन्हे दाखल असून या गुह्यांच्या खटल्यात अजून कोणताही निर्णय झालेला नाही. मध्य प्रदेशातील बरवानीमध्ये तीन, अलीराजपूर येथे एक आणि खंडवा जिह्यात पाच गुन्हे दाखल आहेत. या गुह्यांचे खटले दिर्घकाळापासून प्रलंबित असतानाही पाटकर यांनी 30 मार्च 2017 रोजी पासपोर्टसाठी अर्ज करताना या गुह्यांची माहिती लपवली, असे पासपोर्ट कार्यालयाने नोटिशीत म्हटले आहे. याबाबत पासपोर्ट जप्तीची कारवाई का करू नये, अशी विचारणा करीत कार्यालयाने मेधा पाटकर यांच्याकडून 10 दिवसांत उत्तर मागितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या