ममता दिनानिमित्त उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ममता दिनानिमित्त जाणिव संस्थेच्या वतीने दक्षिण मुंबईतील नागरिकांच्या सेवेसाठी देण्यात आलेल्या दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. मलबार हिल परिसरातील एमटीएनएल कार्यालय परिसरात हा कार्यक्रम झाला. यावेळी खासदार अरविंद सावंत, इंडियन ऑइल कार्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी, जाणिव संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेच्या स्थापनेपासून  रक्तदान आणि रुग्णवाहिकेची सेवा दिली जात आहे. हे कार्य आजही अविरतपणे सुरू आहे. शिवसेना या एका राजकीय पक्षाने  सर्वाधिक रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचा हा विक्रम केला आहे. खरं तर या विक्रमाची नेंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने दखल घ्यायला हवी, अशी आशा देसाई यांनी व्यक्त केली.  यावेळी देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिकेच्या चाव्या स्थानिक शिवसेना पदाधिकाऱयांना सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी महानगर टेलिपह्न निगमचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.