Photo – वेटलिफ्टर मीराबाईचा साडीमधला लूक, कुटुंबासोबत साजरा केला वाढदिवस

कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानूने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. मायदेशी परतल्यानंतर मीराबाईने तिचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला. यावेळी तिने एक सुंदर साडी नेसली होती.

मीराबाईने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या वाढदिवसाचे फोटो शेअऱ केले आहेत. या फोटोमध्ये मीराने पिवळ्या रंगाची साडी नेसली असून तिच्या कुटुंबीयांनी फारच सुंदर ड़ेकोरेशन केलेलं दिसत आहे. 

मीराबाईने 49 किलो ग्रॅम वजनी गटात स्नॅचमध्ये 88 किलो वजन उचलले तर क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलण्याचा सर्वेत्तम प्रयत्न केला. मीराबाईने एकूण 201 किलो वजन उचलून नवा विक्रम रचला व देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.