मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार 11 ऑगस्ट रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत अप हार्बर मार्गावर आणि सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या..
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल, त्यानंतर पुन्हा मुलुंड डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि गंतव्यस्थानावर नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने पोहोचेल. ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. या गाड्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने पोहोचतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
डाउन धीम्या मार्गावर –
ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.53 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल आसनगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.32 वाजता सुटेल.
अप धीम्या मार्गावर –
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही आसनगाव लोकल आहे जी ठाणे येथून सकाळी 10.27 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण लोकल ठाणे येथून दुपारी 4.03 वाजता सुटेल.
हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत अप हार्बर मार्गावर आणि सकाळी 11.40 ते सायंकाळी 14.40 पर्यंत डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या/सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत कुर्ला- पनवेल दरम्यान 20 मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जातील.
डाउन हार्बर मार्गावर –
- ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 11.04 वाजता सुटेल.
- गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.22 वाजता सुटेल.
- ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सायंकाळी 4.51 वाजता सुटेल.
- ब्लॉकनंतर वांद्रे करीता पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 4.56 वाजता सुटेल.
अप हार्बर मार्गावर –
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 9.40 वाजता सुटेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी 10.20 वाजता सुटेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी 3.28 वाजता सुटेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगाव येथून दुपारी 4.58 वाजता सुटेल.