
पायाभूत सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर आज, रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर तर ठाण्यापलीकडे जाणाऱया जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील.
कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 10.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.48 ते सायंकाळी 4.08 पर्यंत वाशी, बेलापूर, पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी 9.53 ते सायंकाळी 4.10 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरिता सुटणाऱया अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.