
रविवारी मध्य रेल्वने दुरुस्तीच्या कामास्तव पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10.55 ते सायंकाळी 3.55 दरम्यान यूपी आणि डीएन धीम्या मार्गावर, तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
या मेगाब्लॉकमुळे सकाळी 10.48 ते सायंकाळी 3.49 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या डाऊन स्लो मार्गावरील गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या गाड्या भायखळा, परेळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे डाऊन मार्गावर वळवण्यात येतील.
सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 दरम्यान घाटकोपरवरून सुटणाऱ्या अप स्लो लोकल विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप फास्ट मार्गावर चालवण्या येतील आणि या गाड्या कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परेळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.






























































