रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत आणि डाऊन हार्बर मार्गावर 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक आहे. सीएसएमटी येथून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 पर्यंत सुटणाऱया वाशी/बेलापूर/पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगाव येथे जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल.