कश्मीरमध्ये 9 लाख सैनिक कशाला? मेहबुबा मुफ्तींचे देशद्रोही फुत्कार

‘370’ कलम हटवल्यानंतर कश्मीरमध्ये सर्व काही आलबेल आहे तर मग सरकारने कश्मीरमध्ये 9 लाख सैनिक का तैनात केले आहेत? पाकिस्तानकडून होणाऱया आक्रमणाची सरकारला चिंता नाही तर केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात निदर्शने होऊ नयेत, निदर्शने झाली तर ती दडपून टाकावी यासाठी सरकारने लष्कर तैनात केले आहे. लष्कराची गरज सीमेवर आहे, सीमेच्या आत नाही.’, असे देशविरोधी फुत्कार कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटरवर मत मांडताना काढले.

हिंदुस्थानी लष्कर आणि कश्मिरींशी भाजपला काही लेणेदेणे नाही, भाजपला फक्त सत्ता हवी आहे असा आरोप  नजरकैदेत असलेल्या कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला. कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर कश्मीरच्या अनेक भागांत अजूनही निर्बंध आहेत. त्याच केंद्र सरकारने 24 ऑक्टोबरला ब्लॉक विकास परिषदांच्या निवडणुका घोषित केल्यामुळे मेहबुबा चिडल्या आहेत.

लष्कराच्या जवानांबद्दल त्या म्हणाल्या,शहीद जवानांचे बलिदान हायजॅक केले जात आहे. कश्मिरींविरोधात जवानांचा मोहरा म्हणून वापर केला जात आहे. भाजपला ना कश्मिरींची चिंता ना जवानांची, त्यांना फक्त निवडणुका जिंकण्याची चिंता आहे, अशीही टीका मेहबुबा यांनी केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या