Mark Zuckerberg मार्क झुकेरबर्गच्या घरी तिसऱ्यांदा पाळणा हलला, कन्यारत्नाचा लाभ झाला

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या घरी नुकतेच एका चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. मार्क हे तिसऱ्यांदा पिता बनले आहेत. झुकरबर्ग यांनी फेसबुकवर फोटो पोस्ट करत ही गोड बातमी दिली आहे.

फेसबुक पोस्टमध्ये पत्नी प्रिसिला चॅन आणि आपल्या चिमुकल्या परीचा फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यांनी आपल्या गोंडस मुलीचं नाव देखील सांगितलं आहे. त्याचसोबत त्या नावाचा अर्थ देखील शेअर केला आहे.

नेमका काय आहे नावाचा अर्थ? 

मार्क झुकरबर्ग यांच्या घरी आणखी एक छोटा पाहुणा आला. झुकरबर्ग यांची पत्नी प्रिसिला चॅन हीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. यासंदर्भात मार्क यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. या जगामध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. खरंच तू देवाने दिलेला आशीर्वाद आहेस, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, मार्क झुकरबर्ग आणि प्रिसिला यांचे हे तिसरे अपत्य आहे. पुढे मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या नवजात मुलीचं नाव ऑरिलिया असं ठेवलं असल्याची माहिती पोस्टमध्ये शेअर केली आहे. ऑरिलिया शब्दाचा अर्थ सोनेरी (Golden) असा आहे.

मी तिसऱ्यांदा बाबा होणार..

मार्क झुकरबर्ग यांनी सप्टेंबर 2022 मध्ये सोशल मीडियावर पत्नी प्रिसिला ही गर्भवती असल्याची माहिती दिली होती. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं की, तो तिसऱ्यांदा बाबा होणार आहे. मेटा सीईओने पत्नी प्रिसिला चॅन हिचा फोटो शेअर करताना ही गोड बातमी दिली होती.