सुपरइंटेलिजेन्स! मेटाने लाँच केला स्मार्ट ग्लास

मेटा प्लॅटफॉर्म्सने इन्बिल्ट डिस्प्ले असलेला स्मार्ट ग्लास लाँच केला आहे. या स्मार्ट ग्लासची किंमत 799 डॉलर म्हणजेच 70 हजार 403 रुपये आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी मेटा रेबन डिस्प्ले आणि एक नवीन रिस्टबँड कंट्रोलर लाँच केला. नव्या डिस्प्ले ग्लासेसमध्ये एक छोटा डिजिटल स्क्रीन दिला आहे. ज्यात नोटिफिकेशनसारखी बेसिक माहिती दिसेल. या स्मार्ट ग्लासला युजर्स रिस्टबँडद्वारे हाताने टेक्स्ट किंवा कॉल रिस्पॉन्ससारख्या कमांडला कंट्रोल करू शकतील.