‘हेक्टर’ देशातील पहिल्या इंटरनेट कारचे अनावरण, असे आहेत सुपरडुपर फिचर्स

mg-hector-internet-car

>>विशाल अहिरराव । मुंबई

एमजी मोटरने (MG Motor) आज हिंदुस्थानची पहिल्या इंटरनेट कार ‘हेक्टर’चे (Hector) अनावरण केले. वायफाय सेवा, व्हॉईस रेक्गनायझेशन अँड रिप्लाय तंत्रज्ञान, नेव्हिगेशन असे स्मार्ट फिचर्स या कारमध्ये इनबिल्ट देण्यात आले आहेत. त्यामुळे अॅक्सेसेरीजची गरज उरणार नाही अशी ही परिपूर्ण कार म्हटली जात आहे. 19 विशेष सुविधांनी सुसज्ज ही हिंदुस्थानची पहिली 48व्ही हायब्रिड एसयुव्ही आहे. या कारसाठी नोंदणी जून महिन्यात सुरू होणार असून त्याच महिन्यात ती हिंदुस्थानच्या रस्त्यांवर धावताना दिसेल असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. मात्र असे असले तरी या कारची किंमत अजून समोर आलेली नाही.

मुंबईतील जेडब्ल्यू मेरियट या आलिशान हॉटेलमध्ये या हेक्टर कारचे अनावरण अत्यंत दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. इंटरनेटने सज्ज असल्याने हेक्टरमध्ये स्मार्ट तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. सर्वोत्तम 10.4 इंच टॅब टचस्क्रीन यामध्ये देण्यात आला आहे. 48 व्होल्ट लिथियम-आयन बॅटरी असणारी ही हायब्रिड कार आहे. कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यावर यामध्ये जोर दिला आहे. ही कार कम्युनिकेश करणारी कार आहे. एखादी व्यक्ती ज्याप्रमाणे आपल्याशी संवाद साधते अगदी तशाच प्रकारे ही कार देखील आपल्याची संवाद साधते. व्हाईस रेक्गनायझेन आणि रिप्लाय या तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. कोणतीही कृती तुम्ही बटणाचा वापर न करता केवळ तोंडी सूचना देऊन करू शकता. गाणे सिलेक्ट करणे असो, किंवा सन रुफ ओपन करणे असो. एका सूचनेवर साऱ्या क्रिया होतात. गाडीत वायफाय सुविधा देण्यात आहे. नेव्हिगेशन देखील इनबिल्ट आहे. त्यामुळे तुम्हाला वेगळ्या अॅक्सेसरीजची गरज लागणार नाही, अशा सोयी आहेत.

हेक्टर नाव का दिलं?

हेक्टर हे ट्रॉयच्या प्रसिद्ध लढवय्याचे नाव आहे. या कारचे फिचर्स लक्षात घेता या लढवय्यावरून प्रेरित होऊन या कारला हेक्टर हे नाव देण्यात आले आहे. एफ-35 (f-35 fighter) या लढाऊ विमानाप्रमाणे त्याची फ्रंट साईड डिझाईन करण्यात आली आहे.

हिंदुस्तानच्या ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून डिझाइन आणि विकसित केलेली हेक्टर देशातील सर्व भागात आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देईल असा दावा ही कंपनीकडून या वेळी करण्यात आला. या महिन्याच्या सुरवातीला कंपनीच्या हलोल, गुजरात येथे उत्पादन सुरू करण्यापूर्वी या गाडीची भारतात एक दशलक्ष किलोमीटर्सपेक्षा जास्त चाचणी घेण्यात आली आहे.

एमजी मोटर इंडिया 50 शहरांतील आपल्या 120 आउटलेट्सच्या व्यापक नेटवर्कद्वारे पुढील काही आठवड्यांमध्ये हेक्टर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास आरंभ करतील. या वर्षी सप्टेंबरच्या अखेरपर्यंत आपले नेटवर्क 250 आउटलेट्सपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. हेक्टरसाठी प्री-ऑर्डर्सची सुरुवात पुढच्या महिन्यात सुरू होईल, तारखांची घोषणा पुढील काही आठवड्यांमध्ये केली जाईल. हेक्टर पेट्रोल आणि डिझेट दोन्ही प्रकारात उपलब्ध असेल.

“हिंदुस्थानची पहिली इंटरनेट कार असलेल्या एमजी हेक्टरला उच्च प्रतिच्या स्वदेशी तत्त्वावर बनवण्यात असून पॉवर-पॅक सुविधांनी सज्ज आहे. हिंदुस्थानमध्ये हेक्टरच्या रुपाने ग्राहकांना सर्वोत्तम कार देण्यासाठी कटीबद्ध आहोत. ही कार आणि त्यातील फिचर्स हिंदुस्थान नागरिकांना आवडतील,” असा विश्वास एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा यांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या